देश
श्रीरामांप्रमाणे आचरण करणे कठीण!
- 65 Views
- January 29, 2020
- By admin
- in देश, समाचार
- 0 Comments
- Edit
‘भारतीय संस्कृतीत आदर्श म्हणून श्रीरामांकडे पाहिले जाते. श्रीरामाला मानणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, श्रीरामांप्रमाणे आचरण करणे कठीण आहे,’ असे मत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी सोमवारी मांडले.
भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी विश्वशांती विद्यापीठातर्फे २० ते २३ फेब्रुवारीदरम्यान दिल्लीत होणाऱ्या दहाव्या छात्र संसदेनिमित्त निशंक यांच्या हस्ते घंटानाद करण्यात आला. एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष प्रा. राहुल कराड, कुलगुरू डॉ. एन. टी. राव, छात्र संसदेचा राष्ट्रीय समन्वयक विराज कवाडिया, विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेचा अध्यक्ष अविनाश टेंबे आदी या वेळी उपस्थित होते.
अध्यात्म आणि विज्ञानाद्वारे नवी दिशा देणाऱ्या विवेकानंदांना आजच्या युवकांनी समजून घेतले पाहिजे. संकटकाळात नेतृत्वगुणांच्या आधारे मात करू शकणारे विद्यार्थी घडवण्याचा सरकारचा उद्देश आहे. शिक्षण, विज्ञान आणि संशोधन यांच्या समन्वयातून शिक्षण देऊन असे विद्यार्थी निर्माण करायचे आहेत, असेही डॉ. निशंक म्हणाले. भारतीय छात्र संसदेच्या माध्यमातून देशातील युवकांना दिशा दिली जात असल्याचे प्रा. राहुल कराड यांनी सांगितले.