देश,राजनीति
व्हॉट्सअँप बनला ‘खबर्या’
सोमवार ७ एप्रिल २०१४ पुणे : खबर्या हा एके काळी पोलिसांच्या माहितीचा मोठा स्रोत होता; परंतु जसजसे आधुनिक तंत्रज्ञान येऊ लागले, तसा खबर्या मागे पडला आणि आधुनिक साधनसुविधांचा आधार घेण्यास सुरुवात झाली. पोलिसांना आता नवा खबर्या मिळाला आहे. या खबर्याचे नाव आहे ‘व्हॉट्सअँप.’ पोलीस आयुक्तालयातील काही पोलीस ठाण्यांच्या पोलीस निरीक्षकांनी तसेच वरिष्ठ अधिकार्यांनीही ग्रुप करून व्हॉट्सअँप फॉर ‘इन्व्हेस्टिगेशन’चा फंडा राबविला आहे. सध्या सर्वच वयोगटांत अँड्रॉईड फोनची क्रेझ आहे. त्याला पोलीस तरी कसे अपवाद ठरतील? शहर पोलीस दलातील बर्याच पोलिसांकडे आधुनिक मोबाईल फोन दिसतात. ज्याच्या हातामध्ये असा फोन आहे, त्याच्या फोनमध्ये व्हॉट्सअँप असतेच असते. पोलिसांचे खबरे, हितचिंतक आणि माहिती देणारेही सध्या पोलिसांना व्हॉट्सअँपच्या माध्यमातून मेसेज पाठवून माहिती देत असतात. तसेच गुन्हेगार, चोरटे, घरफोडे, सोनसाखळीचोर यांची छायाचित्रेही पाठविल्यामुळे पोलिसांना त्यांचा माग काढणे सोपे जाते. पोलिसांच्या या अनेक गंभीर गुन्ह्यांच्या तपासामध्ये पोलिसांना व्हॉट्सअँपमुळे महत्त्वपूर्ण माहिती मिळविणे अधिक सोपे झालेआहे. पूर्वी केवळ खबर्यांच्या आधारे करण्यात येणार्या तपासाला अधिक गती देण्यासाठी पोलिसांनी वेळोवेळी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. सध्या शहरातील काही महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांनी व्हॉट्सअँपची मदत घेण्यास सुरुवात केली आहे. डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रवीण चौगुले यांनीही पोलीस ठाण्यातील कर्मचारी व अधिकार्यांचा व्हॉट्सअँपवर ग्रुप तयार केला आहे. दैनंदिन कामासाठी पोलीस ठाणे स्तरावर ग्रुप तयार करून घडलेले गुन्हे, बंदोबस्त, तपास, घडामोडी आणि महत्त्वपूर्ण सूचना या ग्रुपवर देण्यात येतात. कोणतीही महत्त्वाची माहिती क्षणार्धात सर्वांपर्यंत पोहोचविण्यात याची मोठी मदत होते. तसेच, अडचणीतील नागरिकांपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठीही याची मदत होत असल्याचे चौगुले यांनी सांगितले. हडपसर पोलिसांनी तर शुक्रवारी घर सोडून गेलेल्या चार शाळकरी मुलींचा व्हॉट्सअँपच्या साह्याने शोध घेतला. या मुली मनमाडच्या दिशेने गेल्याचे समजल्यावर पोलिसांनी प्रसंगावधान दाखवून मनमाड पोलिसांच्या काही अधिकार्यांचे मोबाईल क्रमांक मिळविले. त्या मोबाईल क्रमांकावर पळून गेलेल्या ४ मुलींची छायाचित्रे पाठविली. त्या छायाचित्रांच्या आधारे मनमाड पोलिसांनी या मुलींना बरोबर ओळखून ताब्यात घेतले. पोलीस अधिकारी त्यांच्या बॅचमेटच्या मोबाईल क्रमांकांवर व्हॉट्सअँपद्वारे संपर्कात आहेत. त्यांचेही ग्रुप्स आहेत. यामुळे राज्यभर पसरलेले हे अधिकारी आपापल्या भागातील गुंतागुंतीच्या आणि महत्त्वपूर्ण गुन्ह्यांची माहिती एकमेकांना देतात. आरोपींचा शोध घेण्यासाठी तसेच गुन्हे उघडकीस येण्यासाठी व्हॉट्सअँपचा उपयोग होत आहे. (प्रतिनिधी)
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.