देश
लॉकडाऊनमध्ये रत्नागिरीत अडकलेल्यांसाठी दिलासादायक बातमी
- 104 Views
- May 07, 2020
- By admin
- in देश, समाचार
- 0 Comments
- Edit
लॉकडाऊनमुळे अनेक नागरिक विविध जिल्हा, राज्यांमध्ये अडकले आहेत. लॉकडाऊनचा कालावधी वाढवला असला तरी रेड झोन वगळता या नागरिकांना स्वत:च्या घरी जाण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे. रत्नागिरीतून इतर जिल्ह्यात जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे.
रत्नागिरीतून लोकांना घरी सोडण्यासाठी एसटी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांना आपल्या घरी जाता येणार आहे.
उद्या रायगड, सिंधुदुर्ग, बुलढाणा, लातूर, भंडारा, सातारा, गोंदिया आणि अमरावतीकरता एसटी बस सोडण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील विविध बस आगारातून एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत.