अपराध समाचार
लग्नानंतर ११ दिवसात सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीने संपवलं जीवन
- 138 Views
- December 05, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- 0 Comments
- Edit
लग्नानंतर अवघ्या ११ दिवसात तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पूर्णिमा (२२) असे मृत तरुणीचे नाव आहे. हैदराबादच्या सनातनगरमध्ये मंगळवारी ही घटना घडली. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या पूर्णिमाने आई-वडिलांच्या इच्छेविरोधात जाऊन लग्न केले होते. पूर्णिमाच्या आई-वडिलांनी पोलिसांशी बोलताना मुलीच्या मृत्यूसाठी नवऱ्याला जबाबदार धरले आहे.
पूर्णिमा आणि कार्तिकचे २२ नोव्हेंबरलाच लग्न झाले होते. कार्तिकचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. लग्न झाल्यापासून ते सनातनगरमध्ये राहत होते. मंगळवारी संध्याकाळी पूर्णिमाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कार्तिकनेच पोलिसांना पत्नीच्या आत्महत्येची माहिती दिली. पोलिसांनी प्रक्रियेनुसार कलम १७४ (संशयास्पद मृत्यू) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पूर्णिमाने आत्महत्या करण्याआधी लिहिलेली एक चिठ्ठी सापडली आहे. त्यामध्ये तिने आत्महत्येचे इतके टोकाचे पाऊल का उचलले ? ते स्पष्ट केलेले नाही. पत्रामध्ये तिने आपल्या आई-वडिलांबद्दल लिहीले आहे. आई-वडिलांपासून लांब असल्याचे आज मला खूप वाईट वाटते. तिने आईला वडिलांची काळजी घ्यायला सांगितली आहे. सोमवारी रात्रीच कार्तिकचा वाढदिवस साजर केला. रात्री उशिरापर्यंत पार्टी सुरु असल्यामुळे दोघेही मंगळवारी सकाळी उशिरा उठले.
कार्तिक आणि पूर्णिमामध्ये कुठल्याही विषयावरुन वाद झाला. त्यानंतर कार्तिक बेडरुममध्ये झोपण्यासाठी निघून गेला तर पूर्णिमा हॉलमध्येच थांबली होती. कार्तिक हॉलमध्ये आला त्यावेळी त्याने पत्नीचा पंख्याला लटकलेल्या अवस्थेतील मृतदेह पाहिला. मुलीच्या आई-वडिलांच्या तक्रारीत पूर्णिमाच्या मृत्यूसाठी तिच्या आई-वडिलांना जबाबदार धरले आहे.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.