राजनीति
रोड शोदरम्यान केजरीवालांच्या श्रीमुखात भडकावली
- 310 Views
- April 04, 2014
- By admin
- in राजनीति, समाचार
- 0 Comments
- Edit
शुक्रवार ४ एप्रिल २०१४ ऑनलाइन टीम नवी दिल्ली, दि. ४ – राजधानी दिल्लीतील रोड शो दरम्यान आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करत त्यांना थप्पड मारण्यात आल्याची घटना शुक्रवारी घडली. दक्षिण दिल्लीतील दक्षिणपुरी येथे प्रचारादरम्यान केजरीवालांवर एका तरूणाने हल्ला केला. त्याने केजरीवालांना थप्पड मारली तसेच दोनचार ठोसेही लगावल्याचे समजते. दरम्यान या हल्ल्यानंतर ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी त्या हल्लेखोरांला बुकलून काढले व नंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. हा हल्ला नेमका कोणी केला हे अद्याप कळलेले नाही. या हल्ल्यांनतर केजरीवाल यांनी समर्थकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. ‘विरोधकांना जे करायचे आहे ते करूदे, आम्ही आमच्या मार्गाने प्रचार करत राहू’ असेही केजरीवाल यांनी सांगितले. यापूर्वीही केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. हरियाणातील चरखी दादरी येथे अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.