दुनिया
‘रेमंड’च्या अब्जाधीश सिंघानिया पिता-पुत्रांचा फ्लॅटवरुन वाद
- 189 Views
- August 08, 2017
- By admin
- in दुनिया, समाचार
- 0 Comments
- Edit
‘रेमंड लिमिटेड’चे प्रमुख गौतम सिंघानिया आणि त्यांचे वडील विजयपत सिंघानिया यांच्यात मुंबईतील फ्लॅटवरुन वाद झाला आहे. यासंदर्भात विजयपत सिंघानिया यांनी मुलाविरोधात म्हणजे गौतम सिंघानियांविरोधात मुंबई हायकोर्टात याचिकाही दाखल केली आहे.
मुंबईतील मलबारहिलमधील जे के हाऊस या 36 मजली इमारतीतील ड्युप्लेक्स फ्लॅटच्या ताब्यावरून सिंघानिया पिता-पुत्रांमध्ये वाद सुरु असल्याचं वृत्त एका इंग्रजी वर्तमानपत्राने प्रसिद्ध केलं आहे.
इमारतीच्या पुनर्विकासासाठी करण्यात आलेल्या करारानुसार, जे. के. हाऊसमधील 5 हजार स्क्वेअर फुटांचा प्लॅट विजयपत सिंघानियांना मिळणं अपेक्षित होतं. मात्र गौतम सिंघानियांमुळे तो त्यांना मिळाला नाही, अशा आशयाची याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे. त्याचप्रमाणे गौतम सिंघानिया हे रेमंड लिमिटेड कंपनी फक्त स्वतःची मालमत्ता असल्याप्रमाणे वागतात, असा आरोपही विजयपत यांनी याचिकेत केला आहे.
आता पिता-पुत्रांमधला हा वाद कोणत्या वळणावर जाऊन पोहोचतो याकडे कॉर्पोरेट जगताचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, या वृत्तासंदर्भात गौतम सिंघानिया आणि विजयपत सिंघानिया या दोघांनी अद्याप प्रतिक्रिया दिली नाही.