खेल
रिओ ऑलिम्पिक: सायकलपटूचा अपघात, पाठीचा कणा फ्रॅक्चर
- 356 Views
- August 08, 2016
- By admin
- in खेल, समाचार
- 0 Comments
- Edit
nobanner
रिओ ऑलिम्पिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही अपघातांची मालिका सुरु राहिली. नेदरलँड्सची सायकलपटू अनेमिक वॅन व्लूटेनला शर्यतीतदरम्यान अपघात झाला. यात तिच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर झालं आहे.
अनेमिकला सध्या आयसीयूत दाखल करण्यात आलं असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते आहे.
महिलांच्या सायकल शर्यतीत अनेमिक सुवर्णपदकापासून केवळ 10 किलोमीटर दूर होती. पण एका अवघड वळणावर अनेमिकच्या सायकलचा टायर लॉक झाला. त्यामुळं ती सायकलवरुन उडून रस्त्याच्या शेजारी असलेल्या दगडावर आपटली. यानंतर ती काही काळ बेशुद्ध अवस्थेत पडून होती.
Share this: