खेल
रिओमध्ये भारताचं दुसरं पदक आजच निश्चित होणार?
- 326 Views
- August 18, 2016
- By admin
- in खेल, समाचार
- 0 Comments
- Edit
कुस्तीपटू साक्षी मलिकने रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं पदक जिंकून दिलं. साक्षीने महिलांच्या 58 किलो वजनी गटाच्या फ्रीस्टाईल कुस्तीत कांस्य पदकाची कमाई केली.
साक्षीने भारतासाठी पदकाचं खातं उघडल्यानंतर, आज भारताचं दुसरं पदक निश्चित होऊ शकतं. बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हे पदक पक्क करु शकते.
रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूसमोर आज उपांत्य फेरीत जपानच्या नोझोमी ओकूहाराचं आव्हान असेल. सिंधू आणि ओकुहारामधला हा सामना आज संध्याकाळी पाच वाजून 50 मिनिटांनी खेळवला जाईल.
सिंधूनं उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या वर्ल्ड नंबर टू आणि लंडन ऑलिम्पिकची रौप्यपदकविजेती वँग यिहानचा 22-20, 21-19 असा सरळ गेम्समध्ये धुव्वा उडवला होता. त्यामुळं आता सिंधूकडूनही देशवासियांना पदकाची आशा लागली आहे.