राजनीति
रविंद्र चव्हाणांच्या उपस्थितीत कुख्यात गुंड मयुर शिंदे भाजपमध्ये
शिवसेनेनं एकीकडे पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला असताना ‘पार्टी विथ डिफरन्स’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या भाजपनं पुन्हा एका गुंडाला पवित्र करुन घेतलं आहे. कुख्यात गुंड मयुर शिंदेला भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
ठाणे आणि मुंबईत गंभीर गुन्हे नावावर असलेला गुंड मयुर शिंदेने शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शिंदेच्या पक्षप्रवेशाला राज्यमंत्री रविंद्र चव्हाण जातीनं हजर होते. शिंदेला शिवसेनेने उमेदवारी नाकारल्यानं त्यानं भाजपची वाट धरली. शिंदेवर एका पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला केल्यानंही गुन्हा दाखल झाला आहे.
विठ्ठल शेलार आणि पवन पवार सारख्या गुंडांना पक्षात एन्ट्री मिळाल्यानंतर भाजपवर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठली. त्यानंतरही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या सुधाकर चव्हाणला पक्षात प्रवेश देण्यात आला. सुधाकर चव्हाण यांच्यावर 9 गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. टाडाअंतर्गतही त्यांच्यावर गुन्हा दाखल होता.
खंडणी, जीवे मारण्याची धमकी, फसवणूक केल्याचाही गुन्हा चव्हाणांवर नोंद आहे. बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या डायरीतही चव्हाणांचं नाव आहे. शिवाय नंदलाल समितीने पालिकेतील 5 भ्रष्टाचाराच्या प्रकरणात चव्हाणांवर ठपका ठेवला होता. त्यामुळे अशा लोकांना फक्त पक्ष वाढवण्यासाठी का घेतलं जातंय, असा सवाल विचारला जात आहे.
भाजपने पक्षात स्थान दिलेले गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नेते
पवन पवार :
खून, खंडणी, जमीन बळकावणे अशा गंभीर स्वरुपाच्या 15 गुन्ह्यांची नोंदपोलीस हवालदाराचा खून केल्याप्रकरणात पवन पवार मुख्य आरोपीनगरसेवक झाल्यावरही प्रभाग सभापती असताना खंडणी प्रकरणी जेलची हवा
पिंटू धावडे :
खंडणी, हत्या आणि मारामारी करुन दहशत माजवल्याप्रकरणी गुन्हा नोंदतुरुंगातच कुख्यात बाबा बोडके यांच्यासोबत धावडेची ओळख झालीकनिष्ठ न्यायालयाने पिंटू धावडेची निर्दोष मुक्तता केली2012 साली राष्ट्रवादीने अप्पर इंदिरानगरमधून उमेदवारी दिली, नगरसेवक म्हणून निवड झाली.
श्याम शिंदे :
पोलिसाला मारहाण करणं, दंगल माजवल्यासह आणखी एका गुन्ह्याची नोंद20 जूनला वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल37 दिवस येरवडा तुरुंगाची हवा खाल्ल्यानंतर श्याम शिंदे बाहेरविधीमंडळात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्याचा पक्षप्रवेश पार पडला
विठ्ठल शेलार :
2008 पासून विठ्ठल शेलारवर तब्बल 10 गंभीर गुन्ह्यांची नोंद2010 आणि 2012 मध्ये हत्येचे दोन गुन्हे शेलारवर दाखल14 फेब्रुवारी 2012 ला दत्तात्रय तिकोणे आणि ज्ञानेश्वर कांबळेचं अपहरण करुन पिरंगुटच्या जंगलात हत्या केल्याचा आरोपदोघांचेही मृतदेह घोटवडे गावाजवळील दगडखाणी जाळून राख नदीत फेकल्याचा आरोपअडीच महिन्यांपूर्वी शेलारकडून दोन पिस्तुल जप्त करुन अटक करण्यात आली2014 मध्ये विठ्ठल शेलारवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली होती.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.