अपराध समाचार
मोबाईलवर चित्रिकरण करत पिंपरीत तरुणाची आत्महत्या
- 326 Views
- February 05, 2017
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- 0 Comments
- Edit
nobanner
कर्जबाजारी झालेल्या तरुणाने मद्यधूंद अवस्थेत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पिंपरीमध्ये घडली. हरेश पेशवानी (वय ३२) असे या तरुणाचे नाव असून आत्महत्या करतानाचे चित्रिकरणही त्याच्या मोबाईलमध्ये आढळले आहे.
हरेश पेशवानीने मयूर मोबाईल या दुकानासाठी ९ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. या तणावातून हरेशने धनराज कॉम्प्लेक्समधील राहत्या घरी आत्महत्या केल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास मुंढे यांनी दिली. हरेशने आत्महत्या करताना मोबाईलमध्ये चित्रिकरण केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Share this: