राजनीति
भाऊबंदकी रस्त्यावर भिडली
- 196 Views
- April 04, 2014
- By admin
- in राजनीति, समाचार
- 0 Comments
- Edit
शुक्रवार ४ एप्रिल २०१४ शिवसेना-मनसेच्या कार्यकर्त्यांत राडा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर दोन गटांत हाणामारी वृत्तवाहिनीच्या कॅमेरामनसह ४0 कार्यकर्ते, पोलीस जखमी मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उद्धव आणि राज ठाकरे यांच्यातील गृहकलह चांगला रंगात आलेला असताना गुरुवारी या भाऊबंदकीला मानणार्या शिवसेना-मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगडफेक करत चक्क रस्त्यावर राडा केला. लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासा शिवसेना व मनसेच्या उमेदवारांसोबत आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात राडा झाला. प्रथम घोषणाबाजी, बाचाबाची व त्यानंतर परस्परांवर दगडफेक सुरू झाल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. सुमारे अर्धा तास चाललेल्या दगडफेकीत एका वृत्तवाहिनीचा कॅमेरामन दिलीप रायही जखमी झाला; तर शिवसेना आणि मनसेचे मिळून एकूण ४0हून अधिक कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले. (प्रतिनिधी) शाब्दिक चकमक, शिवीगाळ अन् दगडफेक दक्षिण मध्य मुंबईचे मनसेचे उमेदवार आदित्य शिरोडकर यांच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात गर्दी केली होती. दुपारी