देश
बेस्ट बसला अपघात; चालकाला हृदयविकाराचा झटका
nobanner चेंबूर पोलीस स्टेशन समोर बसंत पार्क येथे मंगळवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास एका बेस्ट बसला अपघात झाला.
चेंबूर पोलीस स्टेशन समोर बसंत पार्क येथे मंगळवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास एका बेस्ट बसला अपघात झाला.
बसचालकाला हृदयविकाराचा झटका आल्यामुळं त्याचा बसवरील ताबा सुटला आणि बस फुटपाथवरील भाजीच्या दुकान घुसून सिग्नलला थांबली.
बस चालक हरिदास पाटील यांना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
बस क्रमांक ३८१ घाटकोपर स्थानक पूर्व येथून टाटा वीज केंद्र चेंबूर येथे जात होती, त्याचवेळी हा अपघात झाला.
रस्त्यावरील तसंच बसमधील कुणीही जखमी नाही, बसमध्ये १० ते १२ प्रवासी होते
Share this: