दुनिया
बेपत्ता विमानाचा शोध लावण्याचे जोरदार प्रयत्न
- 182 Views
- April 04, 2014
- By admin
- in दुनिया, समाचार
- 0 Comments
- Edit
शुक्रवार ४ एप्रिल २०१४ एक नजर (04-04-2014 : 02:13:14) पर्थ : मलेशियाचे बेपत्ता विमान शोधण्यासाठी बहुराष्ट्रीय पथकाने पुन्हा एकदा कंबर कसली असून, विमानाचा ब्लॅकबॉक्स मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न चालले आहेत. ब्लॅकबॉक्सची बॅटरी फक्त आणखी तीनच दिवस चालू राहणार असून, ती शोधण्याची मोहीम आता हाती घेण्यात आली आहे. मलेशियाच्या सरकारने आतापर्यंत हाताळलेल्या शोधमोहिमेवर टीका केली जात असून, पंतप्रधान नजीब रझाक आज ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर आहेत. आठ विमाने व नऊ जहाजे या विमानाचा शोध घेत आहेत. ब्रिटनची अण्वस्त्रवाहू पाणबुडीही आज या शोधात सहभागी झाली आहे. गेले चार आठवडे या विमानाचा शोध घेतला जात असून, आतापर्यंत हा शोध निष्फळ ठरला आहे. मलेशियाच्या अधिकार्यांच्या मते ८ मार्च रोजी २३९ प्रवाशांसह बेपत्ता झालेल्या या विमानातील इंधन संपल्यानंतर ते हिंदी महासागरात कोसळले असावे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अँबॉट यांच्यामते या विमानाचा शोध लावणे ही अत्यंत कठीण बाब असून, विमान सापडेल याची काहीही खात्री देता येत नाही; पण विमान शोधण्याचे कोणतेही प्रयत्न आम्ही सोडणार नाही. मलेशियाचे पंतप्रधान नजीब यांनी