देश
बायको दारु प्यायची, फोनवर मुलांशी बोलायची…भिंतीवर सुसाइड नोट लिहित पतीने संपवलं कुटुंब
- 113 Views
- February 28, 2020
- By admin
- in देश, समाचार
- 0 Comments
- Edit
गाजियाबादमध्ये एका व्यक्तीने आपली पत्नी आणि दोन मुलांची हत्या करुन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. गळफास लावून घेत पतीने आत्महत्या केली. पत्नीवर संशय असल्यानेच त्याने संपूर्ण कुटुंबाची हत्या केली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला आहे. आत्महत्या करण्याआधी पतीने घराच्या भिंतीवर सुसाइट नोट लिहिली होती.
त्याने घराच्या भिंतीवर लिहिलं आहे की, आपली पत्नी दारु प्यायची तसंच मुलांशी फोनवर बोलत असे. पतीने भिंतीवर पाच जणांचे मोबाइल क्रमांकही लिहिले होते ज्यांच्याशी त्याची पत्नी वारंवार फोन बोलायची.
आपण पत्नीला वारंवार रोखण्याचा प्रयत्न करत होतो. तिच्या भावांशी देखील आपण यासंबंधी चर्चा केली. पण त्यांनी बहिणीलाच पाठिंबा दिला असंही त्याने लिहिलं आहे. आपल्या मृत्यूसाठी जबाबदार असणाऱ्यांची नावेही पतीने भिंतीवर लिहून ठेवली आहेत. पोलिसांनी आता त्यादृष्टीने तपास सुरु केला आहे.