अपराध समाचार
प्रेमासाठी मैत्री विसरला, डोक्यात बिअरची बाटली फोडून मित्राची हत्या
- 134 Views
- July 09, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- 0 Comments
- Edit
मैत्रीमध्ये प्रेम, त्यागाची भावना असते. मैत्री टिकवण्यासाठी काही जण आपल्या प्रेमाचाही बळी देतात. पण बंगळुरुच्या होस्कोटे शहरात एका मुलीसाठी मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना घडली. होस्कोटे शहरातील अमानी दोड्डाकेरे भागामध्ये रविवारी संध्याकाळी एका २३ वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडला.
पवन कुमार असे मृत तरुणाचे नाव आहे. तो मान्यता टेक पार्कमध्ये एका खासगी कंपनीत नोकरीला होता. पवनच्या शरीरावर २३ ठिकाणी भोसकल्याच्या जखमा होत्या. एका मुलीवरुन असलेल्या भांडणातून मित्रानेच पवनची हत्या केली. मुख्य आरोपी तेजस (२३) एका कारखान्यात नोकरी करतो.
पवन आणि तेजस दोघे मित्र होते. दोघांचा एकाच मुलीवर जीव जडला तिथून त्यांची मैत्री शत्रुत्वामध्ये बदलली असे पोलिसांनी सांगितले. शनिवारी संध्याकाळी तेजसने पवनला मोबाइलवर फोन केला व वाद मिटवण्यासाठी अमानी दोड्डाकेरे येथे बोलवले. पवन तिथे पोहोचला त्यावेळी तेजससोबत आणखी एक जण तिथे होता.
तेजसने पवनला त्या मुलीचा पाठलाग थांबवण्यास सांगितले. दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. तेजसने पवनच्या डोक्यात बिअरची बाटली मारली. त्यानंतर त्याला भोसकले. पवन आणि त्याचा साथीदार गुन्हा केल्यानंतर तिथून पसार झाले. रविवारी संध्याकाळी एका वाटसरुला पवनचा मृतदेह दिसला. त्यानंतर हा गुन्हा उघड झाला. पोलिसांनी तेजस आणि त्याच्या मित्राला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.