अपराध समाचार
प्रार्थना बेहेरे, अनिकेत विश्वासरावच्या कारला भीषण अपघात
- 193 Views
- May 14, 2018
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- 0 Comments
- Edit
अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि अभिनेता अनिकेत विश्वासराव यांच्या कारला सकाळी अपघात झाला. लोणावळा येथे त्यांच्या कारला हा अपघात झाला. ‘मस्का’ या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी कोल्हापूरला जात असतानाच हा अपघात झाला.
‘आम्ही दोघंही सुखरुप आहोत. असं असलं तरीही प्रार्थनाच्या हाताला उजव्या हाताला दुखापत झाली आहे. तर तिच्या असिस्टंच्या डोक्याला मार लागला आहे’, असं तो म्हणाला. मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या या अपघातामुळे अनिकेतला धक्का बसल्याचं त्याच्या आवाजातून स्पष्ट होत होतं. अपघात झाला त्यावेळी कारमध्ये अनिकेत, प्रार्थना, प्रार्थनाची असिस्टंट आणि चालक असे चौघेजण उपस्थित होते.
लोणावळ्याच्याच रस्त्यावर असतेवेळी एका टेम्पोला ही कार धडकली आणि हा अपघात झाला. अपघात झालेल्या कारचे फोटो पाहिले असता त्याची भीषणता लक्षात येत आहे. एका बाजुला दरी असल्यामुळे हा अपघात अतिशय भीषण असल्याचं असल्याचं अनिकेतने सांगितलं. रस्त्याच्या डाव्या बाजूने जात असतानाच अचानकच बंद पडलेला टेम्पो समोर आला आणि त्या टेम्पोपासून वाचण्यासाठी म्हणून चालकाने कार वळवली पण, त्याचा कारवरील ताबा सुटला आणि हा अपघात झाला अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. चित्रपटाच्या प्रसिद्धीदरम्यान झालेला हा अपघात लक्षात घेता आता प्रार्थनाला पुढील काही दिवस आराम करण्याची गरज असल्याचं स्पष्ट होत आहे.