अपराध समाचार
पुण्यात हॉटेलमध्ये घुसली फॉर्च्यूनर कार, वेटरचा मृत्यू
- 171 Views
- April 30, 2018
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- 0 Comments
- Edit
पुण्यात सोमवारी दुपारी एक विचित्र अपघात घडला आहे. कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट हॉटेलमध्ये घुसली. पुण्यातील सांगवी परिसरातील फेमस चौकात दुपारी एकच्या सुमारास हा अपघात घडला. एका वळणावर कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट अनंत भोजनालयात घुसली.
या अपघातात हॉटेलमधील एका वेटरचा मृत्यू झाला असून कारचालक आणि महिला जखमी झाली आहे. सुदैवाने यावेळी भोजनालयात कोणीही नव्हते अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. सचिन जाधव असे चालकाच नाव आहे.
गाडीत मुलगा, महिला आणि चालक होता. कारचालक सचिन आणि महिला जखमी झाले आहेत. निखिल पुरोहित असे गाडीच्या मूळ मालकाचे नाव आहे. मृत व्यक्तिचे नाव समजलेले नाही.