अपराध समाचार
पुण्यात भररस्त्यात महिलेची निघृण हत्या
- 385 Views
- October 18, 2016
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- 0 Comments
- Edit
पुण्यात एका महिलेची भररस्त्यात हत्या करण्यात आली आहे. कोथरूडच्या राहुल नगर भागातील ही घटना आहे. सकाळी साठेआठची ही घटना असल्याचं सांगण्यात येत आहे. ही महिला तिच्या बाईकने जात असताना, तिच्यावर हल्लेखोराने धारदार शस्त्राने हल्ला केला आणि त्याची बाईक घेऊन त्याने पळ काढला आहे.
या महिलेचं नाव शुभांगी खटावकर असं असल्याचं सांगण्यात येत आहे. शुभांगी खटावकर या स्वंयपाक करून देण्याचं काम करतात. शुभांगी खटावकर या स्वंयपाक करण्याच्या कामाला जात असताना, त्यांच्या मागावर असलेल्या आरोपीने त्यांची हत्या केली असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
रस्त्यावर रक्तबंबाळ स्थितीत शुभांगी खटावकर पडून होत्या. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत, यामागे कोण आहे हे लवकरच समोर येणार असल्याचं पोलिसांनी म्हटलंय.