अपराध समाचार
पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
- 149 Views
- July 07, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- 0 Comments
- Edit
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंसह पाच जणांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चतु:श्रृंगी पोलिसांनी शनिवारी रात्री सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरुसह पाच जणांवर अनुसुचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिफेक्टरी (भोजनगृह) मध्ये निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात होते. याविरोधात विद्यार्थ्यांनी 1 एप्रिल 2019 ला आंदोलनाचे अस्त्र उगारले होते. तर त्याचवेळी विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाविरोधात चतुःशृंगी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की व मारहाण केल्याची तक्रार विद्यापीठ प्रशासनाकडून चतु :श्रृंगी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यावेळी 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याविरोधात विद्यार्थ्यांनी पुणे न्यायालयात धाव घेऊन विद्यापीठ प्रशासनाविरोधात याचिका दाखल केली. या संपूर्ण प्रकरणावर सुनावणीवेळी कुलगुरूंसह पाच जणांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. न्यायालयाच्या आदेशानुसार शनिवारी रात्री उशिरा कुलगुरुंसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन कळमळकर, कुलसचिव प्रफुल्ल पवार, सिनेट सदस्य संजय चाकण, सुरक्षा संचालक सुरेश भोसले, सुरक्षारक्षक भुरसिंग अजितसिंग राजपूत या सर्वांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.