देश
पिंपरी चिंचवडमध्ये चालत्या टेम्पोत महिलेवर बलात्कार
- 98 Views
- March 12, 2020
- By admin
- in देश, समाचार
- 0 Comments
- Edit
पिंपरी चिंचवडमधील संतापजनक घटना घडली आहे. चालत्या गाडीत महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसर एका धक्क्यात आहे. या घटनेने पुन्हा एकदा महिला सुरक्षित नसल्याचं समोर आलं आहे.
आळंदीहून निघालेल्या या महिलेला पेरणे फाटा येथे जायचे होते. रात्री 11 च्या सुमारास टेम्पो चालकाने पेरणे फाटा येथे सोडतो सांगून महिलेला टेम्पोत बसवले. रात्री 11 ते पहाटे 4 पर्यंत हा प्रकार घडला. टेम्पो चालकाने बलात्कार केला असून क्लिनरने बलात्काराचा प्रयत्न केल्याचं सांगण्यात येत आहे.
या प्रकरणी 29 वर्षीय महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार पोलिसांनी टेम्पो चालक आणि क्लिनरविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
महिला रात्री 11 वाजता टेम्पोत बसली. पेरणे फाट्याजवळ सोडतो सांगितलेल्या टेम्पो चालकाने त्या दिशेला न जाता टेम्पो पिंपरी चिंचवडच्या दिशेने नेला. पिंपरी चिचंवड रोडवर या महिलेवर बलात्कार केला. शिवीगाळ करून मारहाण केली आणि हा प्रकार कुणालाही न सांगण्याची धमकी देखील दिली.
पहाटे चारच्या सुमारास महिलेने कसेतरी टेम्पोतून पळ काढण्यात यश मिळवले. या घटनेने संपूर्ण परिसरात संतापजनक वातावरण निर्माण झालं आहे. 29 वर्षीय महिला एवढ्या रात्री एकटी कुठे चालली होती याची देखील चौकशी केली जात आहे. या घटनेने पुन्हा एकदा महिला सुरक्षित नसल्याच समोर आलं आहे.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.