खेल
पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावणं सोपं नाही, प्रशिक्षक मिकी आर्थर यांचं विराट कोहलीला आव्हान
- 140 Views
- February 07, 2018
- By admin
- in खेल, समाचार
- 0 Comments
- Edit
पाकिस्तान क्रिकेट संघाचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला, पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावून दाखवण्याचं आव्हान दिलं आहे. सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणत्याही प्रकारे क्रिकेटचे सामने खेळवले जात नाहीयेत. मात्र भविष्यात दोन देशांमध्ये क्रिकेट खेळवलं गेल्यास विराटला पाकिस्तानविरुद्ध शतक करणं सोपं जाणार नाही. सध्या ऑस्ट्रेलियात सुट्टीवर असलेल्या मिकी आर्थर यांनी विराटला आव्हान दिलं आहे. “विराट एक उत्तम खेळाडू आहे, पण पाकिस्तानविरुद्ध शतक करणं त्याला जमणार नाही. विराटला फलंदाजी करताना पाहणं हा एक प्रेक्षणीय योग असतो. मात्र पाकिस्तानी गोलंदाज विराट कोहलीला शतक ठोकू देणार नाहीत.” विराट कोहलीबद्दल विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देतेना मिकी आर्थर बोलत होते.
काही दिवसांपूर्वी विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन-डे सामन्यांमध्ये पहिलं शतक झळकावलं होतं. या शतकासह विराट कोहलीने, क्रिकेट खेळणाऱ्या सर्व ९ देशांमध्ये शतक झळकावण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. याआधी सचिन तेंडुलकर आणि सनथ जयसूर्या या दोन खेळाडूंना हा विक्रम करता आला आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये सध्या द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळवली जाणं दुरापास्त असलं तरीही भविष्यात हा योग जुळून आल्यास विराट मिकी आर्थर यांनी दिलेलं आव्हान कसं पार करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.