देश
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये F-16 कोसळलं, फायटर पायलटचा मृत्यू
- 96 Views
- March 11, 2020
- By admin
- in देश, समाचार
- 0 Comments
- Edit
पाकिस्तानी एअर फोर्सचे F-16 हे अत्याधुनिक फायटर विमान बुधवारी सकाळी राजधानी इस्लामाबादमध्ये कोसळले. इस्लामाबादमधील शाकारपारीयन जवळ हे विमान कोसळले. या अपघातात विंग कमांडर नौमान अक्रम यांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानी एअर फोर्सच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली.
२३ मार्चला होणाऱ्या पाकिस्तानी एअर शो च्या सरावासाठी या F-16 विमानाने उड्डाण केले होते असे पाकिस्तान एअर फोर्सकडून सांगण्यात आले. दुर्घटनास्थळी बचाव पथकाला पाठवण्यात आले आहे. या अपघाताचे नेमके कारण शोधून काढण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
F-16 हे पाकिस्तानकडे असलेले अमेरिकन बनावटीचे अत्याधुनिक फायटर विमान आहे. बालाकोट एअर स्ट्राइकनंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी फायटर विमाने भारताच्या हवाई हद्दीत घुसली होती. त्यामध्ये F-16 विमाने सुद्धा होती. दृष्टीपलीकडच्या लक्ष्यावर हल्ला करण्याची या विमानांमध्ये क्षमता आहे. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या या आगळीकीला चोख प्रत्युत्तर देताना विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांच्या मिग-२१ फायटर जेटने पाकिस्तानचे एक F-16 विमान पाडले होते.