राजनीति
निवडणुकीच्या तोंडावर भाजप-सेनेत दुरावा…
- 372 Views
- October 19, 2016
- By admin
- in राजनीति, समाचार
- 0 Comments
- Edit
पालिका निवडणूकीच्या तोंडावर सेना आणि भाजपमधला दुरावा दिवसेंदिवस वाढत चाललीय. आज दादरच्या अग्निशमन केंद्राच्या नवीन वास्तूच्या लोकापर्णाच्या सोहळ्याला भाजपच्या नेत्यांनी दांडी मारलीय.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा लोकापर्णाचा कार्यक्रम झाला. भाजपच्या बड्या नेत्यांनी आधीच कार्यक्रमाला येण्यास नकार दिला होता. पण उपमहापौर अलका केरकर आणि गटनेते मनोज कोटक हे सुद्धा कार्यक्रमाकडे फिरकलेले नाहीत..
यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवर अप्रत्यक्षरित्या टीका केली. आमच्यातल्या काही करंट्या लोकांना वाटतं की मुंबई महापालिकेत काम चागलं नाही. दूसरी कोणती महानगरपालिका असती तर टीकलीच नसती अशी कोपरखळी देखील त्यांनी मारली.