अपराध समाचार
निगडीत सुरक्षारक्षकानेच केली चोरी, हिऱ्यांच्या हारासह ९७ लाख रुपये लंपास
- 178 Views
- June 17, 2018
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- 0 Comments
- Edit
पिंपरी-चिंचवड परिसरातील निगडी प्राधिकरण येथे पंचवटी बंगल्यात सुरक्षारक्षकानेच तब्बल ९७ लाख रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला आहे. ही घटना शनिवारी (दि.१६) मध्यरात्री घडली. याप्रकरणी निगडी पोलिसांत सुरक्षारक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित सुरक्षारक्षक हा नेपाळचा रहिवासी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विनोद राजकुमार अग्रवाल (वय-४८ पंचवटी बंगला, निगडी प्राधिकरण, पिंपरी-चिंचवड) हे त्यांच्या तीन भावासह निगडी येथे राहतात. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता पुण्यातील एका कार्यक्रमासाठी अगरवाल कुटुंबीय बाहेर गेले होते. सहा महिन्यांपूर्वी गोविंद कालू परियार (रा. नेपाळ) याला सुरक्षारक्षक म्हणून कामावर ठेवले होते. अग्रवाल कुटुंबीय बंगल्यात नसल्याचा फायदा घेत त्याने साथीदारांसह दरवाजा तोडून घरातील सोने, चांदीच्या दागिन्यांसह हिऱ्यांचा हार, लॅपटॉप तसेच रोख रक्कम १६ हजार असा ऐकून ९७ लाख २० हजार रुपयांचा ऐवज आणि रोख रक्कम घेऊन पोबारा केला. रात्री दीडच्या सुमारास अग्रवाल कुटुंबीय बंगल्यावर परत आल्यानंतर चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. चोरी करून बाहेर येताना आरोपी गोविंद परियार हा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. आरोपींचा शोधासाठी निगडी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.