देश
नऊ अश्लील चित्रफिती जप्त; सायबरतज्ज्ञांची मदत घेणार
- 119 Views
- February 12, 2020
- By admin
- in देश, समाचार
- 0 Comments
- Edit
‘फेसबुक’वरून अल्पवयीन मुलांचे लैंगिक साहित्य प्रसारित केलेल्या नऊ अश्लील चित्रफिती नालासोपारा तुळिंज पोलिसांनी जप्त केल्या आहेत. ज्यांच्या नावे ‘आयपी’ (इंटरनेट प्रोटोकॉल) अॅड्रेस आहेत, त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. व्यावसायिक वापरासाठी लहान मुलांचा वापर करून या अश्लील चित्रफिती तयार केल्या गेल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
फेसबुकचा वापर करून अल्पवयीन मुला-मुलींचे लैंगिक साहित्य प्रसारित केले जात असल्याचे उघड झाले होते. खुद्द फेसबुक व्यवस्थापनाने याबाबत केंद्र शासनाकडे तक्रार केली होती. ज्या ‘आयपी अॅड्रेस’वरून हे अश्लील साहित्य प्रसारित केले जात होते. त्यांची माहिती फेसबुकने केंद्र शासनाला दिली होती. केंद्राकडून याबाबत महाराष्ट्र शासनाकडे हे प्रकरण कारवाईसाठी वर्ग करण्यात आले होते. पालघर जिल्ह्य़ातील वसई-विरारमधील १७ आयपी अॅड्रेसवरून लहान मुलांचे लैंगिक शोषण (चाईल्ड पोर्नोग्राफी) करण्यात येत होते. हे सर्व ‘आयपी अॅड्रेस’ची वसई, नालासोपारा आणि विरारमध्ये नोंद करण्यात आली आहे.
पालघर स्थानिक गुन्हेने हा गुन्हा नोंदवून पुढील तपास तुळिंज पोलीस ठाण्याकडे वर्ग केला आहे. २३ एप्रिल २०१९ ते ८ मे २०१९ या कालावधीत बालकांचे अश्लील साहित्य संबंधित आयपी अॅड्रेसवरून प्रसारित करण्यात आल्याची माहिती फेसबुकने दिली होती.
यानुसार माहिती तंत्रज्ञान कायदा २००० चे कलम ६७ (ब) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मागील वर्षी दोन महिन्यात या आयपी अॅड्रेसवरून लहान मुला-मुलींच्या प्रसारित झालेल्या नऊ अश्लील चित्रफिती पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या अश्लील चित्रफिती मुलांकडून तयार करवून घेण्यात आलेल्या आहेत, असे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे तुळिंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्रात्रेय पाटील यांनी सांगितले.
त्या परदेशात वितरित केल्या जात होत्या वा व्यावसायिक वापर केला जात होता का, याचा तपास सुरू असल्याचे ते म्हणाले.
आयपी अॅड्रेस ज्यांच्या नावावर आहे त्यांच्यावर हे गुन्हे नोंदविण्यात आलेले आहेत. आम्ही सायबरतज्ज्ञांची मदत घेऊन त्याबाबतची अधिक सविस्तर माहिती मागवत असल्याचे ते म्हणाले.
ज्या व्यक्तींच्या नावे हे आयपी अॅड्रेस आहेत, ते सर्व आरोपी २० ते ३५ वर्षे वयोगटातील आहेत.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.