अपराध समाचार
धक्कादायक! स्लीपर कोच बसमध्ये नातेवाईकानेच अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार
- 141 Views
- November 18, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- 0 Comments
- Edit
धावत्या स्लीपर कोच बसमध्ये नातेवाईकानेच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलगी आई आणि नातेवाईकांसह जयपूरला जात असताना हा प्रकार घडला. पीडित मुलगी शाळेत शिकत आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
तिने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितल्यानंतर त्यांनी शनिवारी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पीडित मुलगी तिच्या नातेवाईकांसह मध्य प्रदेशला गेली होती. तिथून परतत असताना ही घटना घडली.
शुक्रवारी जवाहर सर्कल भागात बलात्काराची घटना घडल्याची माहिती एसएचओ हेमेंद्र शर्मा यांनी दिली. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी झाली असून तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.