अपराध समाचार
धक्कादायक! भारतात पाच महिन्यात २५ हजार पॉर्न अपलोड, एकट्या मुंबईत ५०० प्रकरणं
- 196 Views
- January 28, 2020
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- 0 Comments
- Edit
अमेरिकेने भारताला चाईल्ड पॉर्नसंबंधी धक्कादायक आकडेवारी सोपवली आहे. अमेरिकेने भारतासोबत रिपोर्ट शेअर केला असून भारतात गेल्या पाच महिन्यात चाईल्ड पॉर्नशी संबंधित २५ हजार मटेरिअल वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यात आलं आहे. ही आकडेवारी अमेरिकेच्या नॅशनन सेंटर फॉर मिसिंग अॅण्ड एक्स्प्लॉयटेड चिल्ड्रनने (NCMEC) भारताच्या नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोकडे सोपवली आहे. भारत आणि अमेरिकेमध्ये गतवर्षी हा डेटा शेअर करण्यासंबंधी करार झाला होता.
दिल्ली पहिल्या क्रमांकावर
गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराशी संबंधित गोष्टी अपलोड करण्याच्या यादीत दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे. याशिवाय महाराष्ट्र, गुजरात. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांचाही या यादीत समावेश असल्याचं अधिकाऱ्याने सांगितलं आहे. अधिकाऱ्याने प्रत्येक राज्याची स्वतंत्र आकडेवारी देण्यास नकार दिला आहे. मात्र एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील अशा १७०० प्रकरणांना सायबर युनिटकडे सोपवण्यात आलं आहे.
कारवाईला सुरुवात
गृहमंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी अनेक एफआयआर दाखल करण्यात आले असून देशभरात अनेक ठिकाणी अटकेची कारवाई करण्यात आली आहे. राज्यातील एका अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, “आम्ही कारवाईसाठी ऑपरेशन ब्लॅकफेस असा कोड तयार केला आहे”. अशा पद्धतीचा डेटा सोपवण्यात आल्याची ही पहिली वेळ असून अशा प्रकरणांना हाताळण्यासाठी पोलिसांना मानक कार्यप्रणालीचं पालन करायचं आहे असंही अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
एकट्या मुंबईत ५०० प्रकरणं
सर्व माहिती संबंधित शहरांना पाठवण्यात आली असल्याचं अधिकाऱ्याने सांगितलं आहे. आतापर्यंत सात एफआयआर दाखल झाले असून अजून होणं बाकी आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यात सर्वात जास्त प्रकरणं समोर आली आहे. फक्त मुंबईत ५०० प्रकरणं आहेत. दिल्ली, गुजरात आणि केरळमध्ये ही आकडेवारी मिळण्याआधीच कारवाई करण्यात आली आहे.