अपराध समाचार
धक्कादायक! पुण्यात मृत गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा करताना तलवार, हॉकी स्टिकने वाहनांची तोडफोड
- 139 Views
- May 25, 2018
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- 0 Comments
- Edit
गेल्या काही महिन्यांपासून सतत दहशत माजवण्याचा उद्देशाने सर्वसामान्य जनतेच्या वाहनांना लक्ष्य केले जात आहे. परंतु यापेक्षा ही भयानक म्हणजे आता मरण पावलेल्या अल्पवयीन गुन्हेगाराच्या वाढदिवसानिमित्त फटाके फोडत गाड्यांची तोडफोड केल्याची घटना देहूरोडमध्ये घडली आहे. मध्यरात्री साडेबाराची ही घटना सीसीटीव्हीत देखील कैद झाली. देहूरोड पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही.
अल्पवयीन गुन्हेगार सुबान शेखची गेल्या वर्षी निर्घुण हत्या झाली होती. त्याचा वाढदिवस रात्री साडेबाराच्या सुमारास १० ते १२ जणांच्या टोळक्याने फटाक्यांची आतषबाजी करत साजरा केला. काही वेळाने मात्र सुबानच्या नावाचा जयघोष करत त्याच्या समर्थकांनी तलवार, हॉकी स्टिक आणि लाकडी दांडक्यांनी देहूरोड मधील रेल्वे स्टेशन परिसर अबुशेठ रोड,आणि एमबी कॅम्प येथे दहशत माजवत सहा वाहनांची तोडफोड केली.
जगदगुरू संत तुकाराम यांच्या गावात तोडफोडीच्या घटनांनी कळस गाठला असताना आता ही नवी घटना लाजिरवाणी आहे. तोडफोड आणि दहशत पसरविणाऱ्या टोळक्यांच्या विरोधात पोलीस देखील हतबल झाले असल्याचं चित्र सध्या देहूरोड परिसरात पाहायला मिळत आहे.त्यामुळे पालिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या प्रकरणी अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत.