खेल
ताप उतरला, 12 नंबरची लकी कॅप घालून युवराज सज्ज!
- 166 Views
- May 31, 2017
- By admin
- in खेल, समाचार
- 0 Comments
- Edit
विराट कोहलीच्या भारतीय संघासाठी एक खूशखबर आहे. भारताचा डॅशिंग ऑलराऊंडर युवराजसिंग हा तापातून सावरला असून, सोमवारी सायंकाळी तो टीम इंडियाच्या डिनर प्लॅनमध्येही सामील झाला होता.
युवीनं त्याची ओळख बनलेली 12 क्रमांकाची कॅप परिधान केली होती. या बारा आकड्याचा संबंध युवराजच्या 12 डिसेंबर या वाढदिवसाच्या तारखेशी आहे.
त्यामुळंच युवीनं 12 हा आपला ब्रॅण्ड बनवला आहे. पण तोच युवराज चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रणांगणात पाकिस्तानचे बारा वाजवणार का, हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.
कारण युवी तापातून सावरला असला तरी तो चार जूनच्या सामन्यात खेळण्याच्या दृष्टीनं मॅचफिट आहे का, याची चाचपणी झालेली नाही.
दरम्यान, आजारी युवराजची देखभाल करण्यासाठी त्याची पत्नी हेजलही लंडनमध्ये दाखल झाली आहे. ती युवीसोबतच राहात असल्यानं, त्याची काळजी घेण्याची टीम इंडियाची चिंता दूर झाली आहे.