अपराध समाचार
तरुणीवर तिघांकडून सलग ५१ दिवस बलात्कार
- 153 Views
- May 08, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- 0 Comments
- Edit
१६ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी तरुणीला एका अज्ञातस्थळी कोंडून ठेवलं होतं. तिथे तिघा आरोपींनी सलग ५१ दिवस तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. दोन आरोपी पीडित तरुणीच्या शेजारी राहणारे असून त्यांनी तिला अज्ञात ठिकाणी नेलं होतं. उत्तर प्रदेशात ही धक्कादायक घटना घडली आहे.
तरुणीला ५० दिवस मारहाण आणि लैंगिक अत्याचाराचा सामना करावा लागला. पण अखेर त्यांच्या तावडीतून सुटका करुन घेत तिने घर गाठलं आणि आई-वडिलांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. पोलिसांकडे तक्रार करुनही ते टाळाटाळ करत होते असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. अखेर कुटुंबाने पोलीस अधिक्षकांकडे धाव घेतल्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी सुशिक्षित आहे. आपल्याला नेमक्या कोणत्या ठिकाणी कोंडून ठेवलं होतं हे तिला आठवत नाही. पण आरोपींपैकी दोघांची नावं तिच्या लक्षात आहेत. पीडित तरुणीचे वडील एका फॅक्टरीत काम करतात. त्यांनी सांगितल्यानुसार, ‘एका आरोपीचं नाव छोटू असून तो मध्य प्रदेशचा रहिवासी आहे, आणि दुसरा आरोपी सुरज महोबा येथील आहे. मार्च महिन्यात दोघे आपल्या घरी आले होते आणि मुलीशी मैत्री केली होती’.
‘आरोपींनी तरुणीचं अपहरण केलं आणि एका रुममध्ये कोंडून ठेवलं. तिथे तिच्यावर २ मार्च २२ एप्रिलपर्यंत बलात्कार करण्यात आला. पळून जाण्याचा प्रयत्न केल्यास हत्या करु अशी धमकीही देण्यात आली होती. त्यांच्या गैरहजेरीत आदित्य नावाचा आरोपी मुलीवर अत्याचार करत होता’, अशी माहिती तक्रारीत देण्यात आली आहे. २२ एप्रिल रोजी तरुणीने आरोपींच्या तावडीतून पळ काढला.
तक्रारीत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मुलीने आम्हाला घडलेला सर्व प्रकार सांगितला. आम्ही पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करत वैद्यकीय चाचणी करण्यास सांगितलं. पण पोलिसांनी आम्हाला फक्त एका पेपरवर सही करण्यास सांगितलं. पोलीस आम्हाला कोणतीही माहिती देत नव्हते’. पोलिसांनी आपण एफआयआर नोंदवला असून, लवकरच तरुणीचा जबाब नोंद करु अशी माहिती दिली आहे.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.