अपराध समाचार
ड्युटीवर असणाऱ्या पोलिसावर हल्ला, गंभीर जखमी
- 154 Views
- June 20, 2017
- By admin
- in अपराध समाचार, देश, समाचार
- 0 Comments
- Edit
nobanner
कर्तव्यावर असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला जबर मारहाण करण्यात आलीय. नंदूरबारमध्ये ही घटना घडलीय.
नवापूर तालुक्यातील चिंचपाडा आऊट पोस्ट पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल नरेंद्र जगदाळे यांना ही मारहाण करण्यात आलीय.
सोमवारी रात्री पेट्रोलिंग करताना त्यांचा हॉटेल मनोहरच्या मालकासोबत वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की हॉटेल मालकानं आणि त्याच्या साथीदारांनी जगदाळे यांच्यावर हल्ला केला.
या हल्ल्यात जगदाळे गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Share this: